गोंदिया,दि.20 : भारतीय मुद्रेचा अवमानना करणे गुन्हा असतानाही स्थानिक कुडवा लाईन परिसरातील बॅंक ऑफ बडोदा या शाखेच्या रोखपाल व बॅंकेचे व्यवस्थापक या दोघांनी खातेधारकाकडून नाणी स्वीकारण्यास नकार दिला. दरम्यान खातेधारक कैलाशचंद्र असाटीच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिस ठाण्यात व्यवस्थापकासह दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १७ जानेवारीच्या दुपारी २ ते ५ वाजतादरम्यान घडली.
सविस्तर असे की, रेलटोली येथील बॅंक ऑफ बडोदाच्या शाखेत खातेधारक कैलाशचंद्र असाटी हा १८५0 रूपयांचे नाणी खात्यात जमा करण्यासाठी गेला होता. दरम्यान नाणी मोजण्यामुळे नियमितची कामे प्रभावित होतात असे कारण समोर करून महिला कर्मचारी रोखपाल हिने ५ रूपयांची नाणी घेण्यास नकार दिले. हे प्रकरण प्रभारी व्यवस्थापक खुशबू लोणकर यांच्या कक्षापर्यंत पोहोचले. मात्र, व्यवस्थापकांनीदेखील खातेधारकाला नाणी घेण्यास चक्क नकार देऊन भारतीय मुद्रेची अवमानना केली. एवढेच नव्हे तर खातेधारकाला दमदाटी दिली. या प्रकाराने संतापलेल्या फिर्यादी खातेधार कैलाशचंद्र असाटी यांनी गोंदिया पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीची तूर्त दखल घेऊन बॅंकेतील सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारावर तपासणी करीत बॅंकेच्या दोन्ही कर्मचार्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास प्रभारी ठाणेदार जितेंद्र बोरकर करीत आहेत.
No comments:
Post a Comment