गडचिरोली दि.02: : नागपूर मध्यवर्ती कारागृहात विविध गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या आणि गडचिरोली जिल्ह्याचे रहिवासी असलेल्या कैद्यांच्या ० ते १८ वर्षे वयोगटातील २० पाल्यांना शिक्षणासाठी दरमहा आर्थिक अनुदान दिले जाणार आहे. बंदी कल्याण व पुनर्वसन प्रकल्पाच्या पुढाकारातून त्या लाभार्थींची निवड करण्यात आली आहे.जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाकडून गडचिरोली जिल्ह्यातल्या बंदींच्या पाल्यांच्या शैक्षणिक पुनर्वसनासाठीबालसंगोपन योजनांचा लाभ दिला जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य, टाटा ट्रस्ट मुंबई व कारागृह विभाग यांच्यामधील साम्यंजस्य करारानुसार कारागृह विभागात फेब्रुवारी २०१७ पासून बंदी कल्याण व पुनर्वसन प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पांतर्गत नागपूर मध्यवर्ती कारागृहात ४ सामाजिक कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमाने बंदींच्या पाल्यांना बालसंगोपन योजना उपलब्ध करु न दिली जात आहे. या कार्यात प्रत्यक्ष बंदींच्या घरी भेट देऊन योजनानिहाय मार्गदर्शन तथा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर ते प्रस्ताव जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाकडे सादर करण्यात आले. वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर २० लाभार्थ्यांची निवड करून त्यांना एकित्रतपणे बालसंगोपन योजनांचे धनादेश वितरण करण्यात आले.या धनादेश वितरण कार्यक्र माला जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी अतुल भडांगे, जिल्हा खुल्या कारागृहाचे अक्षीक्षक बाळराजेद्र निमगडे, बंदी कल्याण व पुर्नवसन प्रकल्प नागपूरचे अधिकारी, जिल्हा परीविक्षा अधिकारी किशोर खडगी, मिना लाटकर , यशवंत बावनकर, पुरु षोत्तम मुजुमदार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment