हदग़ाव/गारगव्हाण ३१
नरेश तुप्तेवार
-हदगाव तालुक्यातील येथीलघटना
-जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेतील घटना
-पुरावा नष्ट करण्यासाठी महिलेने साप फेकला चुलीत
-विद्यार्थीच्याच सतर्कतेमुळे 160 विद्यार्थांचा जीव वाचला
-शाळा प्रशासन व स्वयंपाकी महिलेवर कारवाई करण्याची मागणी
-संतप्त पालकांचा शाळेवर असंतोष
-स्वयंपाकी महिला ही जिल्हा परिषद सदस्यांची कुटुंबातील सदस्य
मुख्याध्यापक व शिक्षक त्याकडे लक्ष देण्यास टाळाटाळ
हदगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अंतर्गत प्राथमिक शाळेला खिचडी पोषण आहार शिवजवून प्राथमिक विध्यार्थाना दुपारच्या सुट्टीत हा पोषण आहार दिल्या जातो. हदगाव तालुक्यातील गारगव्हाण येथील जि प च्या प्राथमिक शाळेत बुधवार रोजी खिचडी शिजवण्यात आली त्या खिचडीत स्वयंपाकी लता कैलास सावतकर हिने काळजी पूर्वक खिचडी न केल्यामुळे तो साप तांदुळाच्या पोत्यात असावा त्या शाळेच्या स्वयंपाकी महिलेने तसेच पोते पातेल्यात टाकून पातेल्यावर झाकण ठेवले व खालून त्या पातेल्याला जाळ लावण्यात आला काही वेळाने शाळेला दुपारची सुट्टी झाली व सदरील किचन शेड मधून बाहेर आणून त्या स्वयंपाकी महिलेने विधार्थ्यास वाढण्यास सुरुवात केली शिजलेला हा साप काही विध्यार्थ्यांच्या लक्षात आला त्यांनी सदरील हि बाब स्वयंपाकी महिलेस सांगले त्यामुळे तिने मुलाला वाटप केलेली खिचडी वापस घेतली व ती सर्व खिचडी त्या महिलेने पुरावा नष्ट करण्यासाठी फेकून दिली त्या खिचडीतील तो साप त्या महिलेने काढून पुरावा नष्ट करण्यासाठी चुली मध्ये टाकला हि बाब विध्यार्थाना लक्षात येताच विधार्थानी आपल्या नातेवाईकांना आरडा अरोडा करून सांगितले ते नातेवाईक शाळेकडे आले आणि त्यांनी पाणी टाकून तो साप विझवला त्यामुळे खिचडीतील तो साप अधर्वट जळालेला मिळाला त्यामुळे महिलेच्याकृत्या बद्दल गावात असंतोष निर्माण झाला होता शाळेवर ३०० ते ४०० महिला व पुरुष जमले होते
गारगव्हाण येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १ ते ५ वि पर्यंत असून एकूण विधार्थी संख्या १६० आहेत त्या शाळेचे मुख्याधापक बडेराव सर असून मुख्याध्यापकांचे काम खिचडी शिजली कि नाही सकस आहे कि नाही यांची प्रत्यक्ष पाहणी करून व चव घेऊन विध्यार्थाना देण्यात येते तर यावेळेस शाळेचे मुख्याधापक कुठे होते ? त्यांनी या आहारावर का लक्ष दिले नाही ?
स्वयंपाकी महिला हि जिल्हा परिषद सदस्य यांच्या कुटूंबातील असल्यामुळे त्या कडे शिक्षक व कर्मचारी लक्ष देण्यास टाळाटाळ करीत आहेत असे प्रत्यक्ष गावकऱ्यांचे म्हणणे आहे या अगोदर दोन ते तीन वेळेस अशाच प्रकारच्या घटना झाल्या होता पण तो दबाव आणून तिथेच मिटवण्यात आला या प्रकरणाचा योग्य तो ती चौकशी करून करावी अशा आशयाचे गावकऱ्यांच्या वतीने निवेदन हदगाव तहसील ला देण्यात आले आहे त्या निवेदनावर १०० ते १२५ पालकांनी सह्या केल्या.
No comments:
Post a Comment