चिचगड,दि.05 : सीएम चषक स्पर्धेत स्थानिक श्रीराम विद्यालय चिचगड शाळेच्या मुलीच्या संघाने वायएमसी गोंदियाच्या संघावर दणदणीत विजय संपादन करून आपल्या शाळेचे नाव गौरवाकिंत केले.
या विजयी संघात सोनाली सलामे, प्रीती सोनागर, गायत्री करसाल, नेहा पदाम, मनाली भोयर, सोनिया मिरी, हिना बंजार, नेहा सोनवाने, शिल्पा भोयर, नंदनी सलामे, देविका सोनकुकरा, उत्तरा धानगाये या मुलींचा समावेश होता. विजयी संघातील सर्वांचे आमदार संजय पुराम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अल्ताफ हमीद, प्राचार्य कोल्हारे, पर्यवेक्षक भैसारे, वीरेंद्र अंजनकर, सुरेश गिऱ्हेपुजे, जितेंद्र रहांगडाले, ढाले, गिरी, मार्गदर्शक देविदास धानगाये व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment