Monday, 21 January 2019

जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनाने पोलिसाला चिरडले


चंद्रपूर,दि.21: जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनाने पोलीस शिपायाला चिरडल्याची घटना नागपूर-चंद्रपूर महामार्गावर घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे तस्करांच्या वाढत्या मुजोरीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.यवतमाळहून नागपूरकडे जाणाऱ्या एका वाहनातून जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील खांबाडा चेकपोस्टवर बॅरिकेडिंग करण्यात आले होते. जनावरांची तस्करी करणारे वाहन रात्री अकराच्या सुमारास चेकपोस्टवर आले. त्यावेळी पोलिसांनी वाहन थांबवण्यास सांगितले. मात्र वाहन चालकानं वेग वाढवला आणि एका शिपायाला चिरडले. यामध्ये शिपायाचा मृत्यू झाला. प्रकाश मेश्राम असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...