सिवनी (मध्यप्रदेश)दि.29: मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पाची 'राजकुमारी' म्हणजे 'कॉलरवाली' वाघिणीने नवा विक्रम केला आहे. ही वाघीण आठव्यांदा आई झाली आहे. तिने यावेळी ४ बछड्यांना जन्म दिला आहे. त्यामुळे आतापर्यंत ३० बछड्यांना जन्म देण्याचा विक्रम या 'पेंचच्या राणी'ने केला आहे.
पेंचमध्ये रविवारी (ता.२६ जानेवारी) या वाघींनीला चार बछड्यांच्यासोबत आधिकाऱ्यांनी पाहिले. या वाघीनींस तिच्या रेडिओ कॉलरमुळे कॉलरवाली असे नाव मिळाले आहे. त्याचप्रमाणे सुपरमॉम, पेंचची राणी, राजकुमारी या नावांनी देखील या वाघीनीला ओळखले जाते.
कॉलरवाली वाघीणीने २००८ मध्ये तीन बछड्यांना जन्म दिला होता मात्र वातावरणामुळे तीचे बछडे जास्त काळ जगू शकले नाहीत. या बछड्यांचा २४ दिवसाच्या आतच मृत्यू झाला होता. काही तज्ज्ञांच्या मते, कॉलरवाली वाघीणीने आतापर्यंत १३ ठिकाणी बछड्यांना जन्म दिला आहे व ती बछड्यांना जन्म देण्यासाठी ज्यादातर गुहांची निवड करते. २००८ ते २०१३ या कालावधीत कॉलरवाली वाघीणीने १८ बछड्यांना जन्म दिला. त्यापैकी १४ जिवंत आहेत.
No comments:
Post a Comment