Monday 7 January 2019

... अन् सारे डॉक्टरही रडू लागले!

babyउल्हासनगर,दि07 : एकीकडे शासकीय रुग्णालय म्हणताच अंगावर काटा उभा राहण्याची वेेेळ येेत असतानाच उल्हासनगरातील शासकीय डॉक्टरांच्या अथक परिश्रमामुळे 40 दिवस कोमात असलेल्या नवजात बालकाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढल्यावर डॉक्टरांना रडू कोसळले.आणि आईने तिच्या बाळासोबत बिदाई घेतल्यावर सर्वांचा हुंदका अनावर झाला.
28 नोव्हेंबरला टोकावडे ग्रामीण रूग्णालयात योगिता विनायक हिरवा हया आदिवासी महिलेला प्रसुती कळा येत होत्या. तिने बाळाला जन्म दिला, पण बाळ रडत नव्हते. बाळाने आईच्या पोटात शी केल्याने टोकावडे ग्रामीण रूग्णालयाच्या डॉक्टरानी हिरवा कुटुंबियाना मध्यवर्ती रूग्णालयात उपचारासाठी पाठविले. शासनाच्या 108 रूग्णवाहिकेच्या मदतीने सकाळी आठ वाजता मध्यवर्ती रूग्णालयात पोहचले. कर्तव्यावर असलेले बालरोग तज्ञ रविंद्र रोकडे यानी बाळा तपासले, बाळाचे प्राण वाचण्याची शक्यता शुन्यात जमा होती. 
याबाबत बालरोग तज्ञ डॉ. रविंद्र रोकडे यानी सांगितले कि त्या बाळाला आवश्यक असलेले उपचार मुंबईच्या शासकीय रूग्णालयातच मिळू शकले असते.पण हिरवा यांची परिस्थिती बेताची असल्याने बाळाला दाखल करून घेत उपचार सुरू केले. त्यात डॉ. जान्हवी भोसले यानी विशेष करून लक्ष केंद्रित केले. पण बाळ हा कोमात गेला. हिरवा कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती बघून डॉ.जान्हवी भोसले हया माणुसकीच्या दृष्टिकोनातून स्वत:चा पदरमोड करून बाहेरची औषधे आणत होत्या.
याबाबत डॉ.जान्हवी भोसले यांनी सांगितले, कि जवळपास 50 लहान मुलांवर उपचार करण्यासाठी एकच बालरोग तज्ञ आहेत. त्यामुळे कोणा एका बाळाकडे लक्ष केंद्रित करणे सोपे नव्हते. असे असतानाही परिसेविका शुभांगी वाघ, ममता सहस्त्रबुध्दे, परिचारिका इंदिरा गावित, सुनिता पवार, पवित्रा नन्नावरे, पूनम पडवळ, संजिवनी काकरा, संगिता मोरे यानी या बाळाच्या उपचारावर लक्ष दिले. त्याचे लहान मुलांच्या आयसीयू केंद्रात प्रत्येकाशी एक प्रेमाचे नात जमले आहे. त्यामुळे हया बाळाचा डिस्चार्ज होत असताना अश्रू अनावर झाले आहेत. 
बाळाच्या आई योगिता हिरवा यांनी बाळाला पुर्नजन्म देणा-या मध्यवर्ती रूग्णालयाच्या डॉक्टरांचे आभार मानले. त्यांच्यामुळेच माझे बाळ वाचले, अशी प्रतिक्रिया दिली. याबाबत मध्यवर्ती रूग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक सुधाकर शिंदे यानी लहान मुलांच्या आयसीयूमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टर आणि कर्मचा-यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.मात्र बाळ जेंव्हा आईसोबत निघाले तेंव्हा हुंदका अनावर झालेल्या डॉक्टरांनी तिच्या जाण्याची सोय करून पाणावलेल्या डोळ्यांनी माय-लेकाला बिदाई दिली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...