Sunday, 27 January 2019

स्व.खे. मंडळाचे जिल्हा क्रीडा महोत्सव उद्या

सावलीच्या पटांगणावर होणार स्पर्धेला सुरवात

गोंदिया,दि.27- गोंदिया जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या चार दिवसीय जिल्हा स्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन देवरी तालुक्यातील सावली जिल्हा परिषदेच्या पटांगणावर उद्या सोमवारी (दि.28) सकाळी अकरा वाजता होणार आहे.
 या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे वित्त, नियोजन आणि वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते होणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री ना. राजकुमार बडोले हे असतील. ध्वजारोहक म्हणून गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सीमा मडावी ह्या उपस्थित राहणार आहेत. यावेळी खासदार प्रफुल्लभाई पटेल, गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते , गोंदिया - भंडाराचे खासदार मधुकर कुकडे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून आमदार गोपालदास अग्रवाल, आमदार अनिल सोले, आमदार परिणय फुके, आमदार ना.गो. गाणार, आमदार संजय पुराम, आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी कांदबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दयानिधी राजा, जिपचे उपाध्यक्ष अल्ताफ हमीद, जिप. सभापती शैलजा सोनवाने, विश्वजीत डोंगरे, लता दोनोडे, देवरी पंस सभापती सुनंदा बहेकार, सालेकसाच्या अर्चना राऊत, अर्जूनी मोरचे अरविंद शिवणकर, तिरोडाच्या नीता रहांगडाले, सडक अर्जूनीचे गिरीधारी हत्तीमारे, गोंदियाच्या माधुरी हरिणखेडे,गोरेगावच्या माधुरी टेंभरे, आमगावच्या वंदना बोरकर, जि.प सदस्य दीपकसिंह पवार,सरिता रहांगडाले. उषा शहारे, माधुरी कुंभरे, देवरीचे उपसभापती गणेश सोनबोईर, पंस सदस्य संगीता भेलावे, गणेश तोफे, महेंद्र मेश्राम, देवकी मरई,अर्चना ताराम, मेहतरलाल कोराम, लखनी सलामे, नरेंद्र मडावी, गोंदिया जिपचे शिक्षणाधिकारी उल्हास नरड, राजेश रुद्रकार, शिक्षणाधिकारी (माध्य.) प्रफुल कचवे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेडीवार, सरपंच प्रभूदयाल पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
या स्पर्धेत मैदानी स्पर्धा, वैयक्तिक स्पर्धा आणि सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हातील आठही पंचायत समितीमधील स्पर्धक विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. या स्पर्धेला जिल्ह्यातील नागिरकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्थानिक मुख्याध्यापक संदीप तिडके यांचेसह आयोजकांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...