
या अपघातात जखमी झालेल्या शिक्षकाचे नाव विशाल जी भेंडारकर (वय 35) रा. नवेगावबांध असे आहे.
तालुक्यातील डोंगरगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले विशाल भेंडारकर हे सकाळी धुकेश्वरी मंदीरात देवदर्शनाला गेल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. देवदर्शन करून परतणाऱ्या भेंजारकर यांच्या होंडा साईन (क्र. एम.एच..35 एएफ 9681 या दुचाकीला रायपूरकडून नागपूरकडे जाणाऱ्या कार (क्र. सीजी 04 एलएल 7756) नी जोरदार धडक दिली. परिणामी, भेंडारकर या शिक्षकाचे दोन्ही पाय फ्रक्चर झाले. या अपघाताची नोंद देवरी पोलिसांनी घेतली असून पुढील तपास ठाणेदार कमलेश बच्छाव यांचे मार्गदर्शनात सुरू आहे.
No comments:
Post a Comment