संख (ता.जत),दि.21- स्थानिक आर के पाटील महाविद्यालयात येथे काल रविवारी (दि.20) विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा आणि मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. श्री.शिवराज पाटील उपस्थीत होते. .यावेळी बोलताना ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन करून योग्य दिशेने प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते. विद्यार्थ्यानी अभ्यासाचे नियोजन कसे करावे याचे ऊत्तम मार्गदर्शन त्यानी केले.
या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण करताना आर के पाटील म्हणाले कि, विद्यार्थ्यानी ध्येय बाळगले पाहिजे. ध्येय पूर्ण करण्यासाठी ध्येयाशी एकनिष्ठ राहून प्रयत्न केले पाहिजे.
सुत्रसंचालन प्रा. पी.व्ही वठारे यानी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य के. एस. बिरादार, प्रा.ए एच. बिरादार, एम जे रानगर, मनूर, कोळी, कोरी, हळदकी, माळी,एस एम पाटील तसेच सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी यांनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment