Tuesday, 29 January 2019

चिचगड येथे कृषी प्रदर्शन येत्या शनिवारी

गोंदिया,दि.29- गोंदिया जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत येत्या शनिवारी (दि.2) चिचगड येथे कृषी प्रदर्शन आणि प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थानिक श्रीराम विद्यालयात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सीमा मडावी यांचे अध्यक्षतेत आमदार संजय पुराम यांचे हस्ते करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष हमीद अल्ताफ, सभापती शैलजा सोनवाने, लता दोनोडे,रमेश अंबुले,विश्वजित डोंगरे, देवरी पंचायत समितीच्या सभापती सुनंदा बहेकार, उपसभापती गणेश सोनबोईर, चिचगडच्या सरपंच कल्पना गोसावी, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी दयानिधी राजा, कृषी विकास अधिकारी झेड डी टेंभरे. जि.प. सदस्य दीपकसिंह पवार सरिता रहांगडाले, उषा शहारे, माधुरी कुंभरे, भास्कर आत्राम, मंदा कुंभरे,सरिता कापगते, शीला चव्हान, सुनिता मडावी, रमेश चुऱ्हे, विजय टेकाम, कैलास पटले, पंचायत समिती सदस्य देवकी मरई,संगीता भेलावे, गणेश टोपे,अर्चना ताराम, महेंद्र मेश्राम,मेहतरलाल कोराम, लखनी सलामे, नरेंद्र मडावी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या प्रदर्शनाचा लाभ तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी आणि नागरिकांनी घेण्याचे आवाहन देवरीचे गटविकास अधिकारी मनोज हिरुडकर, सहायक गटविकास अधिकारी एस एम पांडे, कृषी अधिकारी समुनित चुंचुवार आणि व्ही एस बोकडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...