देवरी,दि.10- देवरी आमगाव महामार्गावरील डवकी फाट्यानजीक एका सुमो वाहनाने मारुती डिझायर गाडीला मागून धडक दिल्याची घटना आज (दि.10) रोजी रात्री नऊच्या सुमारास घटली. सुदैवाने कोणाताही अनुचित प्रकार घडला नाही.
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहिती अनुसार, आमगाव कडून देवरीच्या दिशेने येणाऱ्या मारुती डिझायर (क्र. एम एच31सीआर 9466) या चारचाकीला मागून येणाऱ्या सुमो गाडीने (क्र एम एच24सी 9601) जोरदार धडक दिली. यामुळे डिझायर गाडीचे नुकसान झाले. सदर अपघात हा महामार्गाच्या कासवगतीने सुरू असलेल्या बांधकामामुळे झाल्याची चर्चा घटनास्थळावर सुरू होती.
No comments:
Post a Comment