प्रस्ताव दाखल करणार
देवरी,दि.31- देवरी
तालुक्यातील सावली येथे शिक्षण विभागाने स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाच्या माध्यमातून
जिल्हा क्रीडा सत्राचे आयोजन केले. या आयोजनासाठी जिल्हा परिषदेने निधी उपलब्ध
करून दिला. यासाठी सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य
केले. असे असताना मी स्थानिक पदाधिकारी असून सुद्धा राजकीय सूड भावनेतून मला
पत्रिका न देता मला संमेलनात येण्यापासून रोखले. यामागे स्व.खे. मंडळाचे राजकारण
जबाबदार असून मी विषयी पंचायत समितीच्या सभेत प्रस्ताव दाखल करून न्याय मागणार
आहे, असा आरोप देवरी पंचायत समितीच्या माजी उपसभापती आणि पुराडा पंचायत समिती
गटाच्या सदस्य संगीता भेलावे यांनी केला आहे.
सविस्तर असे की,
देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सावली येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने चार
दिवसीय क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा
संमेलनासाठी जिल्हा परिषदेने निधी उपलब्ध करून दिला. यासाठी जिल्हा परिषद आणि
पंचायत समिती सदस्यांनी सुद्धा पाठपुरावा केला. असे असताना स्वदेशी खेळोत्तेजक
मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकाऱ्यांना या
सोहळ्यासाठी आमंत्रित केले होते. मात्र. देवरी पंचायत समितीच्या माजी उपसभापती
भेलावे यांनी आयोजकांनी पत्रिका दिली नाही. त्यामुळे त्या कमालीच्या संतप्त
झालेल्या आहेत. स्थानिक पदाधिकारी असून सुद्धा त्यांना पत्रिका पदाधिकाऱ्यांनी
दिली नाही, असे त्यांनी बेरारटाईम्सला सांगितले. दरम्यान, स्वदेशी खेळोत्तेजक
मंडळाचे पदाधिकारी सुद्धा राजकारणी बनले असल्याची टीका सुद्धा त्यांन केली आहे.
परिणामी, काही राजकारणी मंडळीच्या इशाऱ्यावरून त्यांनी या संमेलनापासून
जाणीवपूर्वक रोखण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गेल्या अनेक आयोजनात स्वदेशी
खेळोत्तेजक मंडळाचा भोंगळकारभार समोर आला आहे. त्यामुळे माजी उपसभापती यांच्या
आरोपाला वजन प्राप्त झाले आहे. दरम्यान, या अपमानासंबंधी त्यांनी सभेत प्रस्ताव
दाखल करून न्यायाची मागणी करण्यार असल्याचेही म्हटले आहे.
निमंत्रण द्यायला
पाहिजे होते- मनोज हिरुडकर, गटविकास अधिकारी
याविषयी देवरीचे
गटविकास अधिकारी मनोज हिरुडकर यांना विचारणा केली असता त्यांनी सर्व
पदाधिकाऱ्यांना कोणत्याही कार्यक्रमात आमंत्रित करण्याची परंपरा आहे. स्व. खे.
मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा श्रीमती भेलावे यांना आमंत्रित करायला पाहिजे
होते. नेमकी ही चुक कोणी केली, हे सांगता येणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment