Tuesday, 29 January 2019

देवरी सीमातपासणीनाक्यावर दलालांचे वर्चस्व

गोंदिया,दि.29- देवरी नजीक असलेल्या परिवहन विभागाच्या आंतरराज्यीय सीमा तपासणी नाक्यावर दलालांच्या वाढलेल्या वर्चस्वामुळे राज्याच्या तिजोरीला चुना लावण्याचे काम मोठ्या प्रमाणावर फोफावले आहे. परिणामी, या दलालांना सीमा तपासणी नाक्यावरून हद्दपार करण्याची मागणी होत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवरीवरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.53 वर शिरपूरबांध गावानजीक पूर्ण सोईसुविधायुक्त आंतरराज्यीय सीमा तपासणी नाका बसविण्यात आला आहे. या ठिकाणी मालाची वाहतूक करणाऱ्या हजारो मालवाहू गाड्या 24 तास धावत असतात. येथील परिवहन अधिकाऱ्यांवर या गाड्यांची तपासणी करण्याची जबाबदारी आहे. या नाक्यावरून जाणाऱ्या वाहनांची योग्य तपासणी करून अतिरिक्त भार, योग्य कादगपत्रे नसणारी वाहणे वा गुन्हेगारी स्वरूपाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करून दोषी वाहन चालकांवर कार्यवाही होणे अपेक्षित आहे. या कार्यवाहीच्या माध्यमातून दोषी वाहनचालकांकडून वसूल होणारा दंड हा कोट्यवधीच्या घरात असतो.
मात्र, या भागात असलेल्या दलालांनी या सीमा तपासणी नाक्यावर आपले वर्चस्व निर्माण केल्याने हे दलाल येथे नियुक्त परिवहन अधिकाऱ्यांवर राजकीय दबाब आणून वाहन चालकांना बिनधास्त वाहतूक करण्यास मदत करतात. सूत्रांनी अशी ही माहिती दिली की, यापूर्वी येथील एका रेंस्टारेंट मध्ये काम करण्याऱ्या नोकरावर बनावट कागदपत्रे प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. परिणामी, बाह्य आणि राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याच्या तिजोरीला चुना लावण्याचे काम जोमात सुरू आहे. सदर रेस्टारेंटमध्ये पुन्हा अवैध कागदपत्रे तयार करण्याचे काम सुरू झाल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.
यामुळे प्रशासनाने या प्रकरणी लक्ष देऊन तेथे कार्यरत परिवहन अधिकाऱ्यांना भयमुक्त वातावरणात काम करण्याची व्यवस्था करावी आणि बाह्य हस्तक्षेप आटोक्यात आणून राज्याचे बुडणारे महसूल वाचवून राज्याची आर्थिक घडी नीट बसविण्याचे प्रयत्न सरकार दरबारी व्हावे, अशी मागणी शिरपूर परिसरातील नागरिकासह सर्वांनी सरकारकडे केली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...