Wednesday 9 January 2019

ब्लॉसम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी साजरा केला रेझिंग डे

देवरी:8जाने.
लोकप्रिय ब्लॉसम पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी गोंदिया पोलीस दलातर्फे 2 जानेवारी ते 8 जानेवारी  पर्यंत आयोजित रेझिंग डे या कार्यक्रमाअंतर्गत देवरी पोलीस स्टेशनला भेट दिली.
सदर कार्यक्रम देवरी चे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ. सुजित टेटे, चंद्रहार पाटील पोलीस उप निरीक्षक, वसंता देशाई, नितीन शिरपूरकर, मिताराम बोहरे,  प्राची रहांगडाले, विनोद लांडगे आदी कर्मचारी उपस्थित होते.
सर्व प्रथम शाळेच्या वतीने सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.
पोलीस स्टेशन मध्ये चालणाऱ्या सर्व कारभाराची विभागानुसार माहिती या वेळी देण्यात आली.
विविध शस्त्रे यावेळी विध्यार्थ्यांना दाखवून संपूर्ण माहिती सांगण्यात आली.
सदर भेट ही विद्यार्थ्यांसाठी ग्रेट भेट ठरली.
सदर कार्यक्रमासाठी शिक्षक नितेश लाडे, हर्ष वैष्णव , वैशाली मोहुर्ले आणि वैशाली टेटे यांनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...