नंदुरबार ,दि.29-गुटखा खाल्ल्यानंतर त्यावर दूध पिल्यामुळे एका तरूणीला विषबाधा झाल्याची घटना नंदुरबार शहरात घडली होती. यामध्येच या तरूणीचा सोमवारी 28 जानेवारीला मृत्यू झाला.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील मुजावर मोहल्ला एकता चौकी येथे राहणारी निषाद अंजूम सलीम सैय्यद या (27 वर्षीय) तरुणीने 5 दिवसांपूर्वी गुटखा खाल्ल्यावर त्यावर लगेच दूध पिले होते. गुटख्यावर दूध पिल्याने तिला विषबाधा झाली आणि त्यामुळे तिची प्रकृती अत्यवस्थ होताच, तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, उपचार चालू असताना तिचा काल सोमवार (दि. 28) जानेवारी रोजी रात्री उशिरा मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, या घटनेचा पोलिस अधिक तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment