Sunday, 20 January 2019

देवरी येथे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका पूजन व प्रवचन दर्शन सोहळा


 देवरी:२० (बेरार टाइम्स)
जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळ, गोंदिया यांच्या विद्यमाने सोमवार 21 जानेवारी 2019 रोजी सकाळी 10 वाजता नगरपंचायत क्रिडांगणाचे भव्य पटांगणावर देवरी जिल्हा गोंदिया येथे अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा  पादुका पुजन व प्रवचन दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
    सध्याच्या धावपळीच्या युगात माणूस यंत्रवत बनत चाललेला आहे. विज्ञानामुळे भौतिक सुखाची मांदियाळी त्याच्या पायाशी लोळण घेत आहे. एका अर्थाने माणसाची प्रगतीच होत आहे, हे जरी खरे असले तरी माणूस अंत:करणातुन कधी कधी हताश निराश झालेला आढळतो. कारण आहे मन:शांतीचा अभाव, आत्मिक समाधानाशिवाय जिवाला पूर्ण समाधान मिळत नाही यासाठी सांप्रत काळात गुरुमार्गाने जावून आत्मोन्नती साधता येते. आपण ही उच्च कोटींची पर्वणी साधावी व या उपासना कार्यक्रमात उपस्थिती लावून अध्यात्मिक शांतीचा अनुभव घ्यावा हेच या कार्यक्रमाचे मुळ उद्दिष्ट असल्याचे आयोजकांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...