गोंदिया ०९: देशातील प्रमुख ११ कामगार संघटना , केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी महासंघ यांनी संयुक्तपणे दि ८ -९ जानेवारी २०१९ रोजी देशव्यापी संप जाहीर केलेला आहे . या संपामध्ये समर्थनार्थ महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय समोर तसेच तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर दुपारी २ -३ वाजे दरम्यान निदर्शने करण्याचा निर्णय राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनाने घेतलेला आहे . सदर संपामध्ये पाठिंबा म्हणून ८ जानेवारी २०१९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया यांचे प्रांगणात दुपारी २-३ वाजे दरम्यान निदर्शने करण्यात सदरील संपाबाबत खालील मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत .
अंश दायी पेन्शन रद्द करणे , सर्व प्रकारचे अनियमित कर्मचारी सेवा नियमित करणे , कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेणे , कामगार कायद्यातील कामगार कर्मचारी धार्जीपणे धोरण मागे घेणे , रिक्त त्वरित भरणा करणे अनुकंपाची पदे भरणे आदी मागण्यासाठी देशव्यापी संप असल्याचे सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक , शिक्षेत्तर कर्मचारी यांना मोठ्या संख्येने देशव्यापी पाठिंबा द्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment