गडचिरोली,दि.31(अशोक दुर्गम)- कोरची तालुक्यातील जमगावमध्ये नक्षलवाद्यांनी 2 जेसीबी आणि 4 ट्रॅक्टर जाळल्याची घटना आज घडली. उत्तर गडचिरोली डिवीजनल कमिटी या नक्षवादी संघटनेने सरकारच्या दमनविरोधी भूमिकेचा निषेध करण्यासाठी झाडे तोडून रस्ता अडवण्यात आला आहे.ट्रकला पेटविल्यानंतर नक्षली बॅनर बांधले आहे.नक्षल्यांनी पुकारलेल्या बंद दरम्यान आठवडभरात ५ इसमाची नक्षल्यांनी हत्या केली.
रात्री २० ते २५ चा संख्येत असलेल्या नक्षल्यांनी कोरची घाटावरील पहिल्या वळणावर चंद्र्रपूर वरून रायपूरकडे जात असलेल्या ट्रकला थांबवत त्यातीलच डिझेल वाहनावर शिंपडत पेटवून दिले. तसेच ठिकठिकाणी झाडे तोडून व दगड रस्त्यावर मांडून वाहतूक बंद पाडली. आज सकाळी वर्तमानपत्रे घेऊन कोरचीकडे जाणारे वाहन पोहचू शकले नाही.
No comments:
Post a Comment