गोंदिया,दि.03ः-गोंदिया शहरा जवळील ग्रामपंचायत तुमखेडा खुर्द येथे गावातील आपसी व राजकीय वादातून ग्रामपंचायत सदस्यांची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची घटना आज 3 जानेवारी गुरूवार ला सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
राजू विश्वनाथ टेंभुर्णीकर वय 45 रा.तुमखेडा खुर्द ता.गोंदिया असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलिसांनी सकाळपासूनच तपासाची चक्रे फिरवित दोन संशयित आरोपी तुमखेडा खुर्द ग्रामपंचायत चे उपसरपंच दुर्गेश लिल्हारे वय 36 वर्ष व त्याचा भाउ प्रकाश लिल्हारे वय 22 वर्ष यांना अटक करण्यात आली आहे. गोंदिया ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेश नारनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार गावातील आपसी व राजकीय वादातून सदर हत्या करण्यात आली. तसेच सदर हत्या हे बुधवार ला रात्री 10 वाजताच्या सुमारास करण्यात आली व हत्या बंदूकीची गोळी झाडून करण्यात आल्याचे उत्तरीय तपासणीत निष्पन्न झाले असून या प्रकरणी आणखी आरोपी आहेत का या बाबदची तपासणी केली जात असल्याचेही नारनवरे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment