
पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांनी जो जुनी पेंशन देण्याच्या मनस्थितीत असेल त्यांचाच आपण २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विचार यापुढे करायचा म्हणून संपुर्ण महाराष्ट्रात कर्मचाऱ्यांनी पेंशन नाही, तर मत सुद्धा नाही ही मोहीम सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या २७ जानेवारी २०१९ ला जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि मंत्र्यांच्या बंगल्यावर हल्लाबोल आंदोलनही करण्यात येणार आहे. नवीन पेंशन योजना रद्द करून जुनी पेंशन योजना सुरू करावी या.मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे.
आजपर्यंत हजारो डीसीपीएस,एनपीएस धारक कर्मचारी सेवेत असताना मरण पावले, परंतु त्यांच्या वारसाला कसलीही अर्थिक मदत मिळाली नाही, त्यांच्या कुटुंबाला शासनाने वाऱ्यावर सोडल्याची भावना आहे.अशा कुटुंबाना फँमिली पेंशन ,ग्र्याच्युटी लागु करावी. एकीकडे आणिबाणीत कारावास भोगलेल्याना पेंशन ,लोकप्रतिनीधींना पेंशन आणि मुळात जुनी पेंशन ही त्या कर्मचाऱ्यांने आयुष्यभर केलेल्या सेवेचं उतारवयात मिळणारं फळ असताना तो नाकारण्याचा खरच शासनाला अधिकार आहे का ? शासनाला आपली जबाबदारी झटकून चालणार नाही, तर सरसकट कर्मचाऱ्यांच्या हक्काची जुनी पेंशन योजना सुरू करावी अशी कर्मचाऱ्यांची भावना आहे.
अन्यायकारक नवीन पेंशन योजना रद्द करून जुनी पेंशन योजना सुरू करावी या मागणीसाठी या लढ्यात ,या आंदोलनात सहभागी होऊन जुनी पेंशनचा लढा तीव्र करावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष विष्णु आडे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment