गोंदिया,दि.01- 1 नोव्हेंबर 2005 व नंतर शासकीय सेवेत आलेल्या कर्मचा-यांना जुनी पेन्शन बंद करून महाराष्ट्र शासनाने नवीन परिभाषित अंशदायी पेन्शन योजना लागू केली आहे. या पेन्शनच्या विरोधात देशभर चळवळ सुरू झाली असून त्याचा फटका नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत सरकारला बसला आहे. दरम्यान, जुन्या पेन्शनसंबंधाने सुरू करण्यात आलेले 'पोस्टर वॉर' आता गोंदिया जिल्ह्यात सुद्धा सुरू झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे गोंदिया जिल्हाध्यक्ष राज कडव यांनी दिली.
छत्तीसगड, तेलंगण, मिझोराम या पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत नो पेन्शन, नो वोट', 'माझे व माझ्या परिवाराचे मत त्यालाच जाईल जो एनपीएस व डीसीपीएस म्हणजे नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करेल' अशी पोस्टर्स लावण्यात आली होती.
दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी तर सभागृह मध्ये आपल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी विधेयक पारित केला, यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी येत्या दोन महिन्यांत कर्नाटक राज्यातील कर्मचा-यांना जुनी पेन्शन लागू करणार असल्याचे सांगितले आहे. तेलंगणा राज्यात तेलंगणा राष्ट्रीय समितीच्या जाहीरनाम्यात जुनी पेन्शनचा मुद्दा होता. त्यादृष्टीने महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना मिळण्यासाठी या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी ही मोहीम सुरू केलेली आहे.
जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांना या पोस्टर वॉर मध्ये सहभागी होण्याचे आवाहन संदीप सोमवंशी, जयेश लिल्हारे, सचिन राठोड , प्रवीण सरगर, जीतू गणवीर,मुकेश राहांगडाले , हितेश राहांगडाले ,लिकेश हिरापुरे, क्रांतीलाल पटले ,चंदू दुर्गे, संतोष रहांगडाले, सुनील चौरागडे, महेंद्र चव्हाण, सचिन धोपेकर, शीतल कनपटे, सुभाष सोनेवाने, जीवन मशाखेत्री, भूषण लोहारे , चिंतामण वलथरे , मोहन बिसेन ,विनोद गहाणे, भूपेंद्र शनवारे, मोहन बिसेन आदी संघटनेच्या नेत्यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment