Tuesday, 29 January 2019

राजेभक्षर जमादार
पाडोंझरी (ता.जत )29येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा पांडोझरी लोकनियुक्त सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली अनेक विषयावर प्रदीर्घ चर्चा होऊन अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
 यावेळी ग्रामस्थांनाच्या वतीने अनेक महत्त्वपूर्ण विषय मार्गी लावण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी  उपसरपंच नामदेव पुजारी यांनी अत्यंत शिस्तबद्ध व संयमी पद्धतीने कामकाज हाताळल्याने प्रत्येक प्रश्नावर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
ग्रामसभेत प्रामुख्याने वैयक्तिक लाभाच्या योजनेचे लाभार्थी निवडणे, वैयक्तिक शौचालय मंजूर करणे,  चारा छावणी किंवा चारा डेपो मागणी करणे, पाणंद रस्ते मंजूर करणे, पर्यावरण संतुलित योजनेमध्ये गावाचा समावेश करणे, विकासकामांचा कृती आराखडा, व्यायाम शाळा प्रस्ताव पाठविणे अशा अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविणेकामी निर्णय घेण्यात आले. हि सर्व माहिती ग्रामसेवक पोतदार यांनी सांगितले.
या ग्रामसभेत सरपंच जिजाबाई कांबळे उपसरपंच नामदेव पुजारी सदस्य  तुकाराम कोरे   आबासाहेब लोखंडे आपा कटरे रूकमिनी गडदे कमलाबाई पुजारी  शिवबाई मांग, माजी  जि प अध्यक्ष आण्णासाहेब गडदे,  शिवापा बाबानगर, विठोबा बिराजदार, सुभाष कांबळे ,सतीश बिराजदार , जि प शाळेचे शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी  बोलताना उपसरपंच नामदेव पुजारी म्हणाले,"मी एकटाच गावाचा सरपंच नसून, आपण सर्वच सरपंच आहोत, या भावनेतून गावाचा विकास करूया. गाव नक्कीच सुजलाम् सुफलाम् झाल्याशिवाय राहणार नाही."
या ग्रामसभेला गावातील ग्रामस्थ मोठ्या , संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...