Saturday, 5 January 2019

माजी मंत्री डी.पी. सावंत यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न तर, स्वीय सहायकाला जबर मारहाण

नांदेड,दि.५.:- काँग्रेसचे माजी शिक्षण राज्यमंत्री डी. पी. सावंत तालुक्यातील तळणीत गेले असता गावकरी आणि त्यांचे स्वीय सहायक यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यांनतर नागरिकांनी सावंत यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. सावंत यांच्या स्वीय सहाय्यकाला नागरिकांनी शनिवारी दुपारच्या सुमारास जबर मारहाण केली.
काँग्रेसचे माजी शिक्षण राज्यमंत्री डी. पी. सावंत यांच्या नांदेड उत्तर मतदार संघातील विविध गावात विकास कामांचे भूमिपूजन सुरू होते. नांदेड तालुक्यातील लिंबगाव, धानोरा येथील पाणंद रस्ते आणि रस्त्याच्या भूमीपूजनानंतर तळणीचा पाणंद रस्ता, गावातील अंतर्गत रस्ते भूमिपूजन व युवक काँग्रेसच्या शाखेच्या फलकाच्या अनावरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी माजी शिक्षण राज्य मंत्री डी. पी. सावंत आणि काँग्रेसचे पदाधिकारी गावात दाखल झाले. यावेळी गावातील कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी त्यांना आश्वासनाची पूर्तता केली नसल्याने त्यावर प्रश्न उपस्थित केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...