लाखनी,दि.20- नगरपंचायत आणि संताजी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लाखनी येथील संताजी मंगल कार्यालयात महिला संमेलनाचे आयोजन काल (दि.19)करण्यात आले होते.
या संमेलनाचे उद्घाटक आमदार बाळा काशिवार यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी पद्माकर बावनकर, नगराध्यक्ष ज्योती निखाडे, उपाध्यक्ष माया निंबेकर, सुशीला भिवगडे, रेखा भाजीपाले, लाखांदूर नगरपंचायत नगराध्यक्ष भारती दिवटे,पं. स. सदस्य रजनी पडोळे, गायत्री सोनवणे, मुख्याधिकारी कांचन गायकवाड, योगिनी भांडारकर, सुरेखा निर्वाण, दीपाली जांबुळकर, साधना वंजारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार काशिवार यांनी मकरसंक्रांत उत्सवाचे धार्मिक महत्त्व उपस्थितांना पटवून देतांना महिलांचा हा उत्सव असून त्यांना शुभेच्छा दिल्या. यासोबतच गरीब, अंत्योदय महिलांना या शासनाच्या वतीने सन्मानजनक योजना सुरू केलेल्या आहेत त्याचा फायदा घ्यावा असे आवाहन केले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी भिवगडे व आभार ज्योती निखाडे यांनी मानले.
No comments:
Post a Comment