गोंदिया ,दि.३१ः : देशात असे बरेच लोक आहेत ज्यांच्याकडे कुणाचे आरोग्य बिघडले तर औषधे विकत घ्यायलाही पैसे उपलब्ध नसायचे.त्यातच काँग्रेसच्या काळात सरकारी दवाखान्यांची हालत खस्ता होती.औषध पुरवठा काळ्या बाजारात विकला जात असे. आणि मग सामान्य व्यक्तीला तीच औषधे बाहेरून विकत घ्यावी लागायची ज्याची किंमत सामान्य माणसाला परवडण्यासारखी नव्हती. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने १ जुलै २०१५ ला प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना सुरु केली. ज्या अंतर्गत अनेक जनऔषधी दुकाने सुरु करण्यात आली असून बाजारभावा पेक्षा ६० ते ७० टक्क्यांपर्यंत कमी किमतीची औषधे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.खऱ्या अर्थाने सामान्यांचा विचार करत सरकारने सामान्यांना दिलासा देण्याचे कार्य केले आहे असे प्रतिपादन जि . प. माजी उपाध्यक्ष तसेच भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केले.
ग्राम गर्रा येथे मोठ्या संख्येने गावकरी बांधवानी केंद्र आणि राज्यसरकारचे हात आणखी मजबूत करण्याचा निर्णय घेत विनोद अग्रवाल यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री भाऊराव उके तसेच सुजित येवले (सरपंच ग्रा . प. रावणवाडी ) हे सुद्धा उपस्थित होते. पुढे बोलतांना अग्रवाल म्हणाले कि जनऔषधी परियोजनेमुळे फक्त स्वस्तात औषधे मिळणार नसून स्वतःचे वितरण केंद्र सुरु करून नवा रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न देखील भाजप सरकार ने केला आहे. जनऔषधी स्टोर सुरु करण्यासाठी सरकार अडीच लाखांचे अनुदान सुद्धा देणार आहे तसेच अनेक प्रकारचे सहायय देखील यात तरुणांना जनऔषधी स्टोर सुरु केल्यानंतर सरकार तर्फे करण्यात येणार अशी माहिती दिली.
यावेळी भाजप प्रवेश करणार्यांमध्ये कुवरलालजी बरडे (भु . पु. सेवा सहकारी अध्यक्ष), सुरजलालजी बोपचे (उपाध्यक्ष सहकारी संस्था), भुवनप्रसादजी तिवारी ( भू. पु. सेवा सहकारी सदस्य), सहेसरामजी मेहर, निलकंठजी गावळे (ग्रा . प. सदस्य), गजेंद्रजी गावळे, यशवंतजी तिघारे ( त. मु. सदस्य), कन्हैय्यालालजी बरडे ( सामाजिक कार्यकर्ते), पुनभजी बरडे (युवा संघटन सचिव), दिलीपजी तिवारी, महेशजी मिश्रा, सेवकरामजी बरडे ( तेली समाज अध्यक्ष), पुरुषोत्तमजी वैध, देवराजजी बरडे,खेमचंदजी वैध, माणिकचंदजी येडे, हुलकरामजी येडे (वरिष्ठ सल्लागार), निळेश्वरजी बरडे, जितेशजी मेहर यांचा समावेश आहे.या वेळी मुन्नालालजी रहांगडाले, पुनेश्वरजी बरडे, जियालालजी बोपचे, बसंतरावजी रहांगडाले, नरेशजी रहांगडाले, मणिलालजी पटले, गणेशजी हरिणखेडे, संतोषजी बिसेन, हिवराजजी बिसेन, सतीशजी बरडे, योगराजजी टेम्भरे , रवीजी जवारकर, कलेशजी सोनवाने, धनीरामजी पटले, दिलीपजी गौतम, देवराजजी टेम्भरे, सुनिलजी भगत, बसंतजी पटले, कुवारलालजी बोपचे, केवलालजी ठाकरे, सुरेशजी टेम्भरे, त्रिभुवनजी हरिणखेडे, कपूरचंदजी रहांगडाले, धनलालजी, झनकलालजी रहांगडाले आणि अन्य भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment