Sunday, 6 January 2019

ओबीसींनी आत्मसन्मानाचा लढा उभारावा- अमोल मिटकरी




देसाईगंज,दि.06ः- देशातील मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी फुले, शाले, आंबेडकरासारख्या अनेक महापुरुषांनी लढ उभारून प्रस्थापितांना हादरवून सोडले. या तमाम महापुरुषांनी दलित, आदिवासी व इतर मागसवर्गीय समाजाला उन्नतीचा मुलमंत्र दिला. मात्र ओबीसी समाजाने महापुरुषांच्या विचारांना बगल दिल्याने आज हा समाज दिशाहिन झाला आहे. राजकीय पक्ष या समाजाचा केवळ वापर करून घेतो. पण मूलभूत अधिकारांपसून वंचित ठेल्या जाते. जर संवैधानिक अधिकार मिळवायचा असेल महापुरुषांचे विचार अंगीकारून आत्मसन्मानाचा लढा उभारला पाहिजे, असे आवाहन ओबीसी समाज विचारावंत अमोलदादा मिटकारी यांनी केले.
देसाईगंज येथे शुक्रवारी स्थानिक दीक्षाभूमीच्या पटांगणात ओबीसी समाज संघटनेच्यावतीने ओबीस समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी अँड. चंद्रलाल मेर्शाम, सेवानवृत्त न्यायाधीश डॉ. श्रीराम गहाणे, मुरलीधर सुंदरकर, मारोतराव बगमारे, धनपाल राऊत, ममता जांभूळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला संबोधित करताना मिटकरी म्हणाले, देशात पुरातण काळापासूनच ओबीसी व तत्सम समाजाचे शोषण सुरू आहे. या देशातील मुठभर लोकांनी आपली सत्ता अबाधीत ठेवून या समाजाला सामाजिक, आर्थिक व रालकीय हक्कापासून वंचित ठेवले. या समाजाला न्याय मिळावा यासाठी छ. शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर, बिरसामुंडा यांचेसह अनेक महापुरुषांनी प्रस्तापित व्यवस्थेविरुध्द लढा उभारला. ज्या समाजांनी महापुरुषांचे विचार अंगिकरले त्या समाजाची प्रगती होत असल्याचे चित्र आज पहावयास मिळते. मात्र ओबीसी समाज प्रस्थापित समाजाने रचलेल्या करस्थानाचा बळी पडला. या समाजाने महापुरुषांचे विचार अंगिकारले नाही. परिणामी आज हा समाज दिशाहीन प्रवाहात जीवन जगत आहे.
राजकीय पक्ष केवळ सत्तेच्या स्वार्थासाठी ओबीसी समाजाचा वापर करतात. संख्याबळ मोठय़ा प्रमाणात असतानाही संघटीतपणा नसल्याने आज संवैधानिक अधिकारांपासून या समाजाला वंचित राहावे लागते. या समाजातील सुशिक्षित युवकांना धार्मिक भावनेच्या माध्यमातूनच उत्तेजीत करून आपल्याच समाल बांधवांच्या विरोधात वापरले जाते. प्रस्थापितांनो हे षड्यंत्र ओळखले पाहिजे. संविधानाने सर्वांनाच समान संधी दिली असून संख्याबळानुसारच आरक्षणाची वर्गवारी केली असताना राजकीय पक्ष मराठा, ओबीसी आरक्षणाच्या मुद्दा निर्माण करून सामाजिक वितुष्ठ निर्माण करताना दिसतात. ओबीसींना पेसा कायद्याच्या माध्यमातून आदिवासी विरोधात संभ्रमण निर्माण करताना दिसतात ही वास्तविकता या समाजाने ओळखली पाहिजे. महापुरुषांनी कधीहीभेदाभेद केला नाही. ओबीसी समाजानी महापुरुषांच्या विचारांची कास धरून आत्मसन्मानाचा लाढ उभारल्याशिवाय सामाजिक परिवर्तन शक्य नाही, असेही मिटकरी म्हणाले. प्रास्ताविक प्रा. दामोधर शिंगाडे यांनी केले. कार्यक्रमाला ओबीसी सह इतरही समाजबांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...