गोंदिया,02- जैन कलार समाजाच्या गोंदिया जिल्हा कार्यकारिणीची सभा गेल्या रविवारी (दि.30डिसेंबर) रोजी स्थानिक पिंडकेपार रोड स्थित समाज भवनात आयोजित करण्यात आली होती. या सभेत जैन कलार समाजाचे संमेलन येत्या 20 जानेवारी रोजी गोंदिया येथे आयोजित करण्याच निश्चित करण्यात आले आहे.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी समाजाचे जिल्हाध्यक्ष तेजराम मोरघडे हे होते. यावेळी जिल्हा सचिव सुखराम खोब्रागडे, कोशाध्यक्ष शालिकराम लिचडे आदी मान्यवर उपस्थित होते. सभेत अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान, दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा समाजाचे स्नेह संमेलन आणि महिला मेळावा घेण्याविषयी सार्वमताने निर्णय घेण्यात आला. या मेळाव्यात महिलांचे हळदीकुंकू, मेहंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, एकल नृत्य, समूह नृत्य, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, सामान्य ज्ञान परीक्षा आदी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. इच्छुक स्पर्धकांनी आपले नाव येत्या 14 तारखेपर्यंत कार्यकारिणी सदस्यांकडे नोंदविण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या सभेला युवा समिती अध्यक्ष चंद्रशेखर लिचडे, सचिव वरूण खंगार, महिला समिती अध्यक्ष शीला इटानकर, सचिव प्राजक्त रणदिवे, शैलजा सोनवाने, संजय मुरकुटे, मनोज किरणापुरे, लालचंद भांडारकर, दिलीप हजार, राजेश पेशने, शाम लिचडे, यशोधरा सोनवाने, मनोज भांडारकर, सुखराम हरडे, सचिन पालांदूरकर, अतुल खोब्रागडे, राजकुमार पेशने, गोपाल हजारे, मनिष ठवरे, रेखा कावळे,वर्षा तिडके, चेतना रामटेककर, रोशन दहिकर, वच्छला पालांदुरकर, देवानंद भांडारकर, विजय ठवरे, विणा सोनवाने आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment