देवरी,दि.08: स्थानिक सीबीएसई संलग्न न्यू सीता पब्लिक स्कूल येथे स्काउट एंड गाइड ऑर्गनाइजेशन मार्फत एकदिवसीय श्रम संस्कार शिविर आयोजित करण्यात आले होते.
प्राचार्य रवी खरवडे यांच्या सुचनेनुसार स्काउट एंड गाइड चे प्रशिक्षक राहुल पांडे यानी सदर उपक्रमाचे आयोजन केले होते. या मध्ये विद्यार्थ्यांनी तंबू उभारणे, लाकडी सेतु तैयार करणे, तराफा बनवून नदी ओलांडणे या सारख्या विविध कलांचे प्रत्यक्षिक करण्यात आले. दरम्यान सर्व स्काउटनी मनोरंजक खेळ सादर केले. संस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आहे. आपल्या मार्गदर्शनातून प्राचार्य रवी खरवडे यानी शालेय जिवनातील शिस्तीचे महत्त्व पटवून दिले, स्काउट एंड गाइड नागपुर चे राहुल वांजारी यानी स्काउट एंड गाइड अंतर्गत विविध उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. सर्वानी समूहभोजनचा आनंद घेत शिविराचा समारोप केला.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी शालेचे स्काउट एंड गाइड प्रभारी आर. टी. पोगले, सहाय्यक शिक्षक उके, सौ. लाडे, सौ. बिसेन सौ. वलथरे व स्काउट एंड गाइड तुकड़ी प्रमुख यानी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment