Tuesday, 8 January 2019

देवदर्शनास जाणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात, दोन जागीच ठार तर पंधरा जखमी

मूल,दि.08 - सावली येथून जामसाडा येथे मंदिरात देवदर्शनासाठी ट्रॅक्टरने जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाव घातला. या भाविकांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर मूल तालुक्यातील चिखली व कन्हाळगावच्या दरम्यान उलटले, यात घटनास्थळीच दोघांचा मृत्यू झाला तर ट्रॅक्टरवर स्वार अन्य पंधरा जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये बोडण निकुरे वय ३५ व चंदू रस्से वय १६ दोघेही राहणार सावली यांचा समावेश आहे. जखमींना तातडीने मूल उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार सदर ट्रॅक्टर अरविंद येनगंटिवार यांची असून ट्रॅक्टरची  अजूनही नोंदणी व्हावयाची आहे तर यात लागलेली ट्राली क्रमांक एम एच ३४ए पी २६११ असे आहे. या अपघातात काही भाविक गंभीर जखमी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या बाबत मूल पोलिसांत अतुल लेनगुरे माजी सरपंच सावली यांनी नुकतीच तक्रार दाखल केली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...