Sunday, 6 January 2019

शासकीय कर्मचाऱ्यांचे निदर्शने आंदोलन मंगळवारला

गोंदिया,दि.०६: सरकारच्या व्यापक कर्मचारी विरोधी धोरणामुळे कर्मचाऱ्यांचा सेवा नियमाधिनतेचा तसेच किमान जीवन वेतन मिळण्यासंदर्भातील जटील समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याची आजची लक्षणिय संख्या लक्षात घेवून त्यांना कायमस्वरुपी सेवाविषयक लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने ८,९ जानेवारी रोजी दशातील ११ प्रमुख संघटना व देशातील सर्व केंद्र व राज्य सरकार मधील संघटना यांनी संयुक्तपणे घोषित केलेल्या देशव्यापी संपाला पाठिंबा देवून ८ व ९ जनेवारी या दोन्ही दिवशी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उग्र निदर्शने आंदोलन करण्याचे आयोजित केले आहे. 
जुनी पेंशन योजना सर्वांना लागू करणे, सर्व प्रकारच्या अनियमित कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणे, कंत्राटी कामगारांना कायमस्वरुपी सेवेत सामावून घेणे, किमान वेतन १८ हजार करणे, सर्व कामगार कर्मचाऱ्यांना सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा लागू करणे, सर्वांना बोनस व भविष्य निर्वाह निधी लागू करणे, कामगार कायद्यातील कामगार विरोधी व मालक धाजिणे बदल मागे घेणे, राज्य पातळीवरील राज्य कर्मचाऱ्यांचे सर्व प्रलंबित प्रश्न सत्वर सोडविणे, रिक्त पदे अनुकंपा तत्वावर पदे भरणे आणि मागण्यांच्या पूर्ततेसाठी देशातील ११ प्रमुख संघटना व देशातील सर्व केंद्र व राज्य सरकार मधील संघटना यांनी संयुक्तपणे संप घोषित केला आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने संपात पाठिंबा जाहिर केला आहे. ८ व ९ जानेवारी या दोन्ही दिवशी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उग्र निदर्शने आंदोलन करुन सरकारच्या कर्मचारी धोरणाविरोधात आक्रमक पवित्रा दाखवायचा आहे. वरील सर्व मागण्या व गुणात्मक बाजूचा विचार करुन प्रत्यक्ष संघ न करता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी, कार्यालयासमोर उग्र निदर्शने आंदोलन करुन देशव्यापी संपास पाठिंबा द्यावा व ८ व ९ जनेवारी या दोन्ही दिवशी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने निर्दशने आंदोलनात उपस्थित राहण्याचे आवाहन राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सचिव लिलाधर पाथोडे, आशिष पी.रामटेके, मदन सी. चुऱ्हे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...