Friday, 4 January 2019

मालकी हक्क पट्टे मिळण्याचा मार्ग मोकळा-आ.फुके

गोंदिया,दि.03 : मागील शंभर वर्षांपेक्षा अधिक काळापासून शासकीय नियमानुसार स्थायी लीज स्वरुपात वास्तव्य करीत असलेल्या गोंदिया शहरातील सीटी सर्वे क्र. ० ते ३२ पर्यंतच्या सर्व नझुल पट्टे धारकांना मालकी हक्क पट्टे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंबंधिचे आदेश मंत्रालयातून नुकतेच जिल्हाधिकाºयांना प्राप्त झाले आहे. आ. परिणय फुके यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे अनेक पट्टे धारकांची समस्या मार्गी लागली आहे.शहरातील नझुल पट्टे धारकांना जमिनीचे मालकी हक्क पट्टे मिळवून देण्यासाठी अनेकांनी आश्वासनाचे गाजर दिले. मात्र याचे निराकरण अद्यापही झाले नव्हते. यानंतर नझुल पट्टे धारकांनी ही समस्या आ.परिणय फुके यांच्याकडे मांडली. त्यांनी याची गांर्भियाने दखल घेत नझुल पट्टे धारकांना जमिनीचे मालकी हक्क पट्टे लवकरच मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.
त्यानंतर फुके यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन नझुल पट्टे धारकांची समस्या त्यांच्यासमोर मांडली. तसेच त्यांना जमिनीचे मालकी हक्क पट्टे देण्याची मागणी केली.मुख्यमंत्री फडणवीस यांनी याची त्वरीत दखल घेत शहरातील नझुल पट्टे धारकांना जमिनीचे मालकी हक्क पट्टे देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी संबंधित विभागाला मालकी हक्क पट्टे देण्यासंदर्भात आवश्यक ती कारवाही पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.
शहरातील नझुल पट्टे धारकांना जमिनीचे मालकी हक्क पट्टे देण्यासंदर्भातील आदेश गोंदिया जिल्हाधिकाºयांना नुकतेच प्राप्त झाले आहे. मागील अनेक वर्षांपासून स्थायी स्वरुपात वास्तव्य करीत असलेल्या शहरातील नझुल पट्टे धारकांना जमिनीचे मालकी हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.शिवाय मागील अनेक वर्षांपासूनची प्रलबिंत समस्या आ.फुके यांनी मार्गी लावल्याबद्दल त्यांचे सर्व नझुल पट्टे धारकांनी आभार मानले आहे.विशेष म्हणजे मागील शंभर वर्षांपासून वास्तव्य करीत असलेल्या नागरिकांना जमिनीचे मालकी हक्क पट्टे न मिळल्याने विविध समस्यांना तोंड द्यावे लागत होते. मात्र फुके यांच्या पुढाकाराने हा प्रश्न मार्गी लागला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...