Thursday 17 August 2017

रेंगेपार येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

लाखनी,17- भारतीय स्वातंत्र्याचा 71 वा वर्धापन दिन लाखनी तालुक्यातील रेंगेपार येथील दीपक विद्यालयात मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.
ध्वजारोहणाचे वेळी मुख्याध्यापक डी डी वासनिक, सुभाष चवळे, भाग्यश्री निशाने, माया सार्वे नागोराव चोपकर, रमेश चांदेवार,देवराम शेंडे, राजू पडोळे, राजकुमार झंझाड. एम एस आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. व्ही आर तुमसरे, एल के हलमारे, पी एश जांभूळकर, व्ही एम हुमणे, जे.बी नवखरे आदी कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले कार्यक्रमाचे संचालन विद्या हलमारे यांनी केले. उपस्थितांचे आभार अनुराधा काडगाये यांनी मानले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...