Tuesday, 8 August 2017

ग्रामसेवकाची ग्रा.पं. सदस्यांशी व्हाट्सअँप ग्रुपमध्ये असभ्य वागणूक


देवरी: (तालुका प्रतिनिधी)- देवरी पंचायत समिती अंतर्गत येणारी सावली ग्रामपंचायत नेहमीचं ग्रामसेवकांच्या हलगर्जी कार्यप्रणाली आणि भ्रष्ट कामासाठी चर्चेत असते. असाच एक प्रकार सावली येथेे समोर आलेला आहे. व्हाट्सअप्प ग्रुपमध्ये  तेथील ग्रामसेवकाने ग्रा. पं. सदस्याला असभ्य टिप्पणी केल्या बद्दल सालेकसा पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदविलेली आहे.
सविस्तर वृत्त असे की,  शहरीक्षेत्रासह ग्रामीण क्षेत्रातही  इंटरनेटची सुविधा उपलब्ध झालेली आहे. ग्रामीण भागातही व्हाट्सएपच्या माध्यमातून आपले कर्तव्य आणि अधिकार सर्वांना कळत आहेत. अशीच एक पोस्ट *"सरपंच कसा असावा"* ग्रा पं सदस्य सावली डुडेश्वर गहाने यांनी व्हाट्स अँप ग्रुप "गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र" मध्ये दि. 02/08/2017 वेळ दुपारी 2:59 टाकली होती. या पोस्टवर सावली चे ग्रामसेवक आर. एम. पटले यांनी "पंढरपूर च्या बैलाने मला पाठविला आहे."  अशी कॉमेंट 02/082017 ला साय. 7.58 ला सदर ग्रुपमध्ये केली.

सदर घटनेची तक्रार ग्रा पं सदस्य गहाने यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती देवरी यांचे कडे केली होती. यावर तात्काळ कारवाई करत पत्र क्र. पत्रक/पं स दे/पं चा/वि अ प/आ स्था/1411/2017 दिनांक-07/08/2017 नुसार असभ्य वर्तन केल्या बद्दल प्रशासकीय कारवाही का करण्यात येऊ नये याचे स्पष्टीकरण अन्यथा  महाराष्ट्र जि.प. व पस अधिनियम (शिस्त व अपील)1964 चे नियम 3 नुसार निलंबनाच्या कारवाही करिता प्रस्ताव मा. मुख्याधिकारी जि प गोंदिया यांचे कडे सादर करण्यात येईल असे नोटीस लेखी स्वरूपात दिले.

सदर ग्रामसेवक आर एम पटले यांच्या वर कारवाही होईल का? ग्रामसेवक सचिव कसा असावा याचे धडे याला देण्यात येतील का? असे सवाल ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य यांना पडलेले आहे.

सदर ग्राम सेवकांच्या निलंबनाची मागणी स्थानिक पातळीवर करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...