गोंदिया,दि.21-जिल्ह्यातील आमगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर पोल्ट्रीफार्मचा व्यवसाय करणार्या इसमाविरुध्द कृषी उत्पन्न बाजार समितीने न्यायालयात दाद मागितली होती.त्या निर्णयानुसार न्यायालयाने सदर जागा ही बाजार समितीच्या मालकीची असल्याचा निर्णय दिला.त्या निर्णयाची माहिती देण्यासाठी आमगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व माजी आमदार केशवराव मानकर हे आपल्या सहकारीसोबत गेले असता गैरअर्जदार प्रविण देशमुख यांनी बाजार समितीचे सभापती असलेले माजी आमदार मानकर यांच्या काॅलरची ओढताण करुन त्यांना मारहाण केली.यामुळे चांगलेच वातावरण तापले गेले.त्यानंतर विद्यमान आमदार संजय पुराम यांनी आमगाव शहर गाठून पोलिस ठाण्यातही धाव घेतली.याप्रकरणात वृत्तलिहिपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.मिळालेल्या माहितीनुसार बाजार समितीचे लेखापाल यांच्या उल्लेख करीत अट्रासिटी कायद्यातर्गंत गुन्हा दाखल कऱण्याची प्रकिया बाजार समितीच्या वतीने असल्याची चर्चा आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment