
देवरी,16 - देवरी येथील सरस्वती शिशु मंदिर येथे आज बुधवारी (ता 16) श्रीकृष्ण जन्माष्टमी तथा गोपाळकाल्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उदघाटन देवरीच्या नगरसेविका मायाताई निर्वाण यांच्या अध्यक्षतेखाली पं. स. सदस्य अर्चना ताराम यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रज्ञा संगीडवार, कमलेश्वरी गौतम , अश्विनी मते, पुष्पा सरवरे, अनिता चन्ने आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिशु विभागातील विद्यार्थ्यांसाठी राधा -- कृष्ण पोषाख आणि चांगले अक्षर स्पर्धा तर प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी श्रीकृष्णावरील गीत - गोष्टी आणि चांगले अक्षर स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. हे विशेष.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश चन्ने, मंदा ठवरे, शालू बारसागडे, अनिता फुन्ने, प्रियंका येनप्रेडीवार, उपासना बहेकार, ज्योती बारसागडे, ममीता वगारे, सुषमा शहारे आदींनी सहकार्य केले.


No comments:
Post a Comment