Saturday 17 November 2018

देवरी येथे वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही


देवरी, दि.17-   विना हेल्मेट दुचाकी चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर देवरी पोलिसांनी दंडात्मक कार्यवाही करीत सुमारे 22 हजारांचा दंड वसूल केला. सदर कार्यवाही ही गेल्या गुरूवारी (दि.15) रोजी देवरी येथे करण्यात आली.
 रस्ता अपघातामध्ये मृत्यू पावणाऱ्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर दुचाकीचालकांचा समावेश असून हा आकडा खाली आणण्याच्या उद्देशाने गोंदिया जिल्हा पोलिस अधीक्षक हरिष बैजल यांनी जिल्ह्यात गेल्या 15 आक्टोबरपासून हेल्मेट शक्तीच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. त्यानुसार सध्या जिल्हा पोलिस वाहतूक विभाग त्यावर अमलबजावणी करीत असून ठिकठिकाणी विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर कार्यवाही करून दंड वसूल करण्यात येत आहे. अशीच कार्यवाही देवरी पोलिसांच्या वतीने गेल्या गुरूवारी देवरीत करण्यात आली. यामध्ये  सुमारे 45 दुचाकीस्वारांवर कार्यवाही करण्यात आली. या कार्यवाहीत  वाहनचालकांवर तडजोड रक्कम(दंड) आकारत सुमारे 22 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सदर कार्यवाही देवरी पोलिसांनी ठाणेदार कमलेश बच्छाव आणि सहायक पोलिस निरीक्षक सचिन ढोके यांचे नेतृत्वात करण्यात आली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...