Tuesday, 20 November 2018

एसीबीचे तत्कालीन पोलीस उपअधिक्षक शिरसाठ लाच घेताना अटक

पुणे,दि.20 : चंद्रपूर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत राहिलेले तसेच सध्या नाशिक येथील आथिर्क गुन्हे शाखेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले राजेश शिरसाठ(48) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे येथे दोन लाख रुपयाची लाच घेताना अटक केली.
शिरसाठ हे चंद्रपूरमध्ये 2012 ते 14 दरम्यान कार्यरत होते.नाशिक आथिर्क गुन्हे शाखेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असतांना एका प्रकरणात पुण्यात वारंट न बजावण्यासाठी त्यांनी एका हवालदारामार्फत तक्रारदाराला दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी त्यांना तसेच हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
चंद्रपूरमध्ये कार्यरत असताना त्यांनी काही अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रकरणामध्ये केस दाखल केली होती. यातील काही प्रकरणांचा न्यायालयाने निपटारा केला असून अधिकाऱ्यांची निर्दोष सुटका केली आहे. विशेष म्हणजे, निकालावेळी न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन उपाधीक्षक शिरसाठ यांच्यासह तपास यंत्रणेवर ताशेरे ओढले होते. दरम्यान आता शिरसाठ हे स्वतःच लाच प्रकरणात अडकल्याने त्यांच्या चंद्रपूर येथील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...