Thursday 23 February 2017

बालेकिल्ल्यात 'इंजिन' रुळाखाली

नाशिक - ज्या महानगरपालिकेत वर्चस्व गाजवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली प्रतिष्ठा कायम ठेवली होती, तेथे पक्षाला जबदरस्त धक्का बसला असून कमळाला फुलविण्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यश मिळाले आले. 
आतापर्यंत हाती आलेल्या निकालानानुसार भारतीय जनता पक्षाला 21, शिवसेनेला 12, काँग्रेसआणि राष्ट्रवादीला 2, तर मनसेला केवळ एका जागेवर यश मिळाले आहे. अनेक ठिकाणी मतदारांनी पॅनलला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक 1, 4, 20 मध्ये भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवार निवडून आले आहेत. तर प्रभाग क्रमांक आठमधील चारही उमेदवार निवडून आणण्यात शिवसेनेला यश मिळाले आहे. प्रभाग क्रमांक 13 मधील दोन जागांवर कॉंग्रेसला यश मिळाले आहे. तर याच प्रभागातील एका जागेवर मनसेला विजय मिळाला आहे. 
खासदार हेमंत गोडसे आणि खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्या पुत्रांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विजयी उमेदवार आज शहरात ठिकठिकाणी विजयोत्सव साजरा करत असल्याचे चित्र दिसत आहे. तर मतमोजणी केंद्रांवर कल विरुद्ध बाजूने गेल्याने अनेक उमेदवारांनी केंद्र सोडून निघून गेल्याचेही आढळून आले आहे. माजी महापौर यतीन वाघ यांच्यासह राष्ट्रवादीच्या विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, नगरसेवक उत्तम दोंदे, माधुरी जाधव यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...