
मुंबई,दि.0४: राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता ४७ ने वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातला कोरोनाग्रस्तांचा आकडा ५३७ वर पोहोचला आहे. महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. या ४७ रुग्णांपैकी ४३ रुग्ण हे मुंबई आणि ठाण्यातले आहेत. यापैकी २८ पॉझिटिव्ह रुग्ण मुंबईत तर १५ पॉझिटिव्ह रुग्ण ठाण्यात सापडले आहेत. अमरावतीत १ रुग्ण, २ पुण्यात, तर पिंपरीत १ रुग्ण सापडला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातली रुग्णसंख्या ५३७ वर गेली आहे. कालरात्रीपर्यंत ही संख्या ४९० होती. आता ही संख्या ५३७ झाली आहे.
आज मुंबईत 28, ठाणे 15, अमरावती 1, पुणे 2, पिंपरी-चिंचवडमध्ये 1 अशा एकूण 47 नव्या रुग्णांची नोंद झाली. राज्यातील एकूण रुग्णांच्या संख्येवर नजर टाकल्यास मुंबईत सर्वाधिक 306, पुण्यात 73, ठाणे आणि एमएमआर परिसरात 70, सांगली 25, अहमदनगर 20, नागपूर 16, बुलढाणा 5, यवतमाळ 4,सातारा आणि औरंगाबाद प्रत्येकी 3, कोल्हापूर आणि रत्नागिरी प्रत्येक 2 आणि सिंधुदुर्ग, गोंदिया, नाशिक, उस्मानाबाद, वाशीम, जळगाव आणि अमरावती येथे प्रत्येकी एका कोरोनाबधिताची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोनाचं संकट वाढताना दिसत आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या सरकारची चिंता वाढवणारी आहे. अशातच आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत कोरोनाचे ३ रुग्ण आढळून आल्याने खळबळ माजली आहे. धारावीत कोरोनाचं संक्रमण वाढलं तर कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढू शकते. त्यानंतर हे रोखणं सरकारसमोर आव्हान असणार आहे. त्याचसोबत मुंबईत सीआयएसएफच्या ६ जवानांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
No comments:
Post a Comment