Wednesday 1 April 2020

कोरोनाच्या धोक्याला घाबरू नका, काळजी घ्या- खा. अशोक नेते यांचे आवाहन


देवरी,दि.01 : कोरोना व्हायरसच्या संकटामुळे संपूर्ण भारत हादरलेला आहे व सर्व नागरिकांना घरीच रहावे लागत आहे. मात्र यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता धैर्याने याचा मुकाबला करून आपली काळजी घ्यावी तसेच गरीब नागरिकांसाठी केंद्र शासनाने सुरु केलेल्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन खा. अशोक नेते यांनी केले आहे.
खा.नेते यांनी पत्रकात म्हटले आहे की, कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणार्‍या गरीब नागरिकांसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंमलात आणली आहे. या योजनेतून गरीब, शेतमजूर व कामगार वर्गाच्या मदतीसाठी १ लाख ७० हजार कोटी रुपयांच्या विशेष पैकेजची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.
या योजनेतंर्गत ८० कोटी शेतमजूर, गरीब परिवारासाठी पुढील ३ महिन्यापर्यंत १० किलो तांदूळ किंवा गहू व १ किलो डाळ स्वस्त धान्य दुकानातून मिळणार आहे. पंतप्रधान जनधन योजनेच्या खाताधारक महिलांना ३ महिने पर्यन्त ५०० रुपयांचे अनुदान तसेच उज्जला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना ३ महिने पर्यंत मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे. रोहयो कामावरील मजुरांची मजुरी १८२ वरून २०० रुपये करण्यात आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकर्‍यांना एप्रिल महिन्यात २ हजार रुपये मिळणार आहेत. वरिष्ठ नागरिक , दिव्यांग नागरिक व विधवा महिलांसाठी ३ महिन्यापर्यंत १००० रुपये देण्यात येणार आहेत, महिला बचत गटांना कर्ज घेण्याची मर्यादा १० लाख वरून २० लाख रुपये करण्यात आली आहे. कोरोना महामारीसाठी सेवा करीत असलेल्या २२ लाख आरोग्य कर्मचार्‍याकरीता ५० लाख रुपयांचा विमा काढण्यात आला आहे. या सर्व योजनांचा लाभ गरीब नागरिकांनी घ्यावा असे आवाहन खा.अशोक नेते यांनी केले आहे

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...