
१ एप्रिल २०२० पर्यंत तर विदेशातून आलेले 78 प्रवासी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या 379 व्यक्तींचे त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी अलगीकरण करण्यात आहे.ते सर्व व्यक्ती जिल्हा प्रशासनाच्या देखरेखीखाली आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने 18 नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.त्यापैकी 17 नमुने निगेटिव्ह आलेले आहेत व एक नमुना यापूर्वीच पॉझिटिव्ह आलेला आहे.
विदेशातून आलेल्या ज्या प्रवाशांचे अलगीकरण केले आहे त्या प्रवाशांना नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय येथून दररोज फोनद्वारे त्यांच्या घरातील उपस्थितीबाबत तसेच वैद्यकीय पथकाने भेट दिली किंवा नाही याबाबत चौकशी करण्यात येत आहे.त्याच बरोबर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याद्वारे संबंधित प्रवाशांच्या सद्यस्थितीबाबत फोनद्वारे विचारणा करण्यात येते.अन्न व औषध प्रशासनाने मास्क व हॅन्ड सॅनिटायझरबाबत एकूण 8 निरीक्षणे नोंदवली आहे. तसेच दोन दुकानांवर जास्त किंमत आकारल्याबद्दल आणि खरेदी व विक्रीचे व्यवहार सादर न केल्यामुळे नोटीस बजावण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment