
मुंबई,दि.05. राज्यात शनिवारी २४ तासांत एकूण १४५ नव्या रुग्णांची नोंद असून आज सकाळी बुलडाण्यात आणखी 3 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
एकूण रुग्णांची संख्या ६३८ वर पोहोचली आहे. यापैकी ९९ रुग्णांची नोंद ही मुंबईत झाली आहे. पुण्यात १२, ठाणे जिल्हा व अन्य मनपामध्ये २२, नागपूर, अहमदनगर, हिंगोली, अमरावती प्रत्येकी १, लातूर ८, उस्मानाबादेत २ रुग्णांची नोंद झाली. शनिवारी ६ जणांचा मृत्यू नाेंद झाला. यापैकी ४ जण मुंबईतील, १ मुंब्रा ठाणे व १ अमरावतीचा आहे. मृत्यूंचा आकडा आता ३२ वर पोहोचला आहे. सध्या राज्यात ४२ हजार ७१३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून २९१३ जण संस्थात्मक क्वाॅरंटाइनमध्ये आहेत. मरकजमधील रुग्णांचा आकडा ७ वर स्थिर आहे. यात निलंग्यातील रुग्णांचा समावेश नाही. यातच आता पुण्यातील मृतांचा आकडा 5 वर गेला आहे. पुण्यातील एका स्लम भागात वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पाचही मृत्यू झालेल्या रुग्णाची ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. स्थानिक संसर्गातून या पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
No comments:
Post a Comment