Friday 1 June 2018

डॉ. दीपक धूमनखेड़े यांची प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी चंद्रपूर येथे बदली


देवरी:०१जून (सुजित टेटे)- राज्यसरकारच्या आरोग्य विभागाच्यावतीने राज्यातील वैद्यकिय अधिकारी तसेच आरोग्य सेवा गट अ वैद्यकिय अधिकारी यांच्या प्रशासकीय बदल्यांचे आदेश  31 मे रोजी काढले आहेत.या आदेशात राज्यातील 287 वैद्यकिय अधिकार्यांची नावे आहेत.त्यामध्ये गोंदिया व भंडारा जिल्हयातील काही नामवंत वैद्यकिय अधिकारी यांचाही समावेश आहे. देवरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. दीपक धूमनखेड़े यांची बदली चंद्रपूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे करण्यात आली आहे.तर त्यांच्या जागेवर ज़िल्हा रुग्णालय चंद्रपूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. दीप्ति श्रीरामे यांची नियुक्ति करण्यात आलेली आहे.  
याच बरोबर यादी नुसार  डॉ. अश्विन अगड़े उप ज़िल्हा रुग्णालय चिमुर यांची प्राथमिक आरोग्य केंद्र कालीमाटी येथे नियुक्ति, डॉ. प्रदीप कांबले बी जे डब्लू गोंदिया तून PHC औराळा औरंगाबाद येथे, डॉ. जोत्स्ना गलार ज़िल्हा रुग्णालय गोंदिया वरुन उप केंद्र पारशिवनी, डॉ आनंद लाडे गोंदिया यांची बदली  प्रादेशिक मनोरुग्नालय नागपुर येथे, डॉ. केतन खरवडे PHC दवनिवाडा वरुन PHC तिस्टी नागपुर येथे, डॉ. काँचन रहांगडाले उप ज़िल्हा रुग्णालय तिरोडा वरुण PHC मूलचुरा येथे डॉ. एल्लम ज़िल्हा रुग्णालय गोंदिया वरुन डागा हॉस्पिटल येथे, डॉ. आशीष नेवारे PHC कालीमाटी वरुन उप रुग्णालय तुमसर येथे करण्यात आलेली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...