ओडिशा येथील पुरीचे सुप्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या खजिन्याची चावी गायब झाली आहे. श्री जगन्नाथ मंदिराच्या प्रबंधन समितीचे सदस्य रामचंद्र दास महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार समितीची बैठक झाली होती. या बैठकीत खजिना ज्या खोलीत ठेवण्यात आला आहे. त्याची चावी गायब झाल्याचे समोर आले होते.
पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत ओडिशा सरकारवर जोरदार टीका केली. या घटनेवरून राज्य सरकार आणि मंदिर प्रशासन स्वत:ची जबाबदारी पार पाडण्यास कमी पडल्याचे दिसून येत असल्याचे शंकराचार्य म्हणाले. तर भाजपने मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याकडून यासंदर्भातील स्पष्टीकरण मागितले आहे.
No comments:
Post a Comment