Monday, 8 January 2018

खरे लाभार्थी घरकुलापासून दूरच

आमगाव,दि.08ःज्यांनी आयुष्यभर घराचे स्वप्न पाहिले, असे अनेक पात्र लाभार्थी आयुष्याच्या संध्याकाळीही शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांपासून वंचित आहेत. त्यामुळे अजूनही ते घराविना हालअपेष्टांचे जीवन जगत आहेत.शासनाने ज्यांना राहण्यासाठी घर नाही, अनेक वर्षे धोकादायक, जुन्या घरात राहतात, अशांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे देण्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे अनेकांनी घर मिळविण्यासाठी अर्ज केला त्यातून सर्वांना घरे देण्यासाठी शासनाने पाऊल टाकले आहे.
मध्यंतरी घरोघरी सामाजिक, आर्थिक, जातनिहाय सर्वेक्षण करण्यात आले. त्यावेळी सर्वे करणार्‍यांनी जी माहिती दिली त्या आधारावर शासनाने काही निकष, अर्टी शर्ती लावून प्रधानमंत्री आवास योजनेसाठी यादी तयार केली आहे.
त्या सर्वेक्षण केलेल्या माहितीनुसार ज्यांनी धोकादायक वा कुडा-मातीच्या घरात आयुष्त घालविले, अशी व्यक्ती या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. अनेकांना ही यादी प्रसिद्ध झाल्याची पुसटशी कल्पनासुध्दा नाही. अनेक गरजू कुटुंब या यादीपासून वंचित राहिल्याने सर्वे कसा केला याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
शासनाने केलेल्या यादीनुसार शासनाला जरी गरजूंना घरे दिले असे वाटत असले तरी प्रत्यक्षात अनेक लाभार्थी या घरकुलांपासून वंचित राहिलेत. त्यातील अनेकजणांनी साठी ओलांडलेले आहेत. यामध्ये हातावर पोट असणारी बहूतांश कुटुंबे आहेत. ज्यांनी जगण्यासाठी, जगविण्यासाठी, आयुष्यभर संघर्ष केला आहे. या पात्र लाभार्थ्यांना अद्यापही न्यायाची प्रतिक्षा आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...