नवी दिल्ली ,दि.२२(वृत्तसंस्था)- दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. सोमवारी दिल्ली पोलिसांनी इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवाद्याला अटक केली आहे. पोलिसांनी दहशतवादी अब्दुल सुभान कुरैशी असल्याचे म्हटले आहे. पोलिसांचे म्हणणे आहे, की 2008 मध्ये गुजरात बॉम्बस्फोटातील तो आरोपी आहे. त्याच्या बॉम्ब तयार करण्याचा आरोप आहे.
पोलिस कुरैशीचा बऱ्याच वर्षांपासून शोध घेत होते. मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत त्याचा समावेश आहे. 2008 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांचा तो मास्टरमाइंड होता.रिपोर्ट्सनुसाह कुरैशी हा बॉम्ब तयार करण्यात तरबेज आहे. त्याला भारताचा ओसामा बिन लादेन म्हटले जाते. सिमीशीही त्याचे संबंध राहिले आहेत. कुरैशीला अटक करण्यापूर्वी पोलिसांची त्याच्यासोबत चकमक झाली. 9 एमएमची पिस्तूल आणि 5 काडतूस कुरैशीकडे सापडले आहेत.
गुजरातमध्ये झाले होते 21 साखळी बॉम्बस्फोट
– 26 जुलै 2008 रोजी अहमदाबाद येथे 70 मिनिटांमध्ये 21 बॉम्बस्फोट झाले होते. यामध्ये 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जखमी झाले होते.11 जुलै 2006 रोजी मुंबईतील लोकलमध्ये झालेल्या स्फोटात 200 जण मृत्यूमुखी पडले होते. 700 लोक जखमी झाले होते.
यामुळे म्हणतात भारताचा ओसामा…
– अब्दुल सुभान कुरैशी उर्फ तौकीर हा उच्च शिक्षित आहे. त्याने इंजिनिअरिंग केले असून त्याचे टेक्निकल नॉलेज चांगले आहे. कुरैशीचे शिक्षण चांगल्या इंग्रजी शाळेतून झाले होते. मुंबईत त्याने शिक्षण घेतले आणि अनेक चांगल्या कंपन्यांमध्ये काम केले. 1996 मध्ये रॅडिकल सोल्यूशनमध्ये काम केले होते. तिथे त्याला 2450 रुपये पगार होता.
-1996 मध्ये मरोळमध्ये सॉफ्टवेअर मेंटनन्सचे काम केले.1998 मध्ये नोकरी सोडून पूर्णवेळ सिमी दहशतवादी संघटनेत काम करत होता.2003 मध्ये मुजाहिद्दीनच्या टॉप मेंबर्समध्ये कुरैशीचा समावेश.अब्दुल कुरैशीला दोन मुली आणि एक मुलगा असल्याची माहिती आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अब्दुल कुरैशीला भारताचा ओसामा बिन लादेन संबोधत त्याच्यावर 4 लाखांचे बक्षिस जाहीर केले होते.
No comments:
Post a Comment