Tuesday, 23 January 2018

ब्लॉसम स्कुलच्या विद्यार्थ्यांची मशरूम उत्पादन केंद्राला भेट


देवरी: 23जाने.
स्थानिक ब्लॉसम पब्लिक स्कुल आपल्या निरनिराळ्या शैक्षणीक उपक्रमासाठी चर्चेत असते. आज पुन्हा एक नवीन उपक्रमा अंतर्गत शिक्षक आणि विध्यार्थ्यांनी देवरी पासून 7किमी अंतरावर असलेल्या सीलापूर गावातील मशरूम उत्पादन केंद्राला मुख्याध्यापक सुजित टेटे , सहा. शिक्षक नितेश लाडे, हर्षदा चारमोडे, वैशाली मोहुर्ले यांच्या मार्गदर्शनात भेट दिली.
सदर परिसर भेट विज्ञान विषयाला अनुसरुन आयोजित केली होती. मशरूम उत्पादन केंद्रात मनीष राऊत यांनी विध्यार्थ्यांना सविस्तर माहिती, प्रात्यक्षिक आणि मशरूम चे आहारातील महत्व पटवून सांगितले. 12 वी पास असलेला मनीष आपल्या परिस्थिती वर मात करून आज तीन प्रकारचे मशरूम बाजारात विकतो. दर महिन्याला 20ते 25 हजार रुपयांचा नफा कमावत असल्याचे त्याने सांगितले सदर परिसर भेटीतुन विध्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. विषयातील संकल्पना प्रत्येक्षात समजली.
सदर परिसर भेटी मध्ये इयत्ता 6वी ते 8वी चे विध्यार्थी सहभागी झाले होते.

परिसर भेटीच्या यशासाठी शिक्षक  आणि विध्यार्थ्यांनी सहकार्य केला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...