Friday 19 January 2018

माजी आ. मोते रुग्णालयातुन करणार जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – ठाणे जिल्ह्यातील असंख्य शिक्षकांची कामे शिक्षणाधिकाऱ्यांनी रखडवली असल्याने मागील काही महिन्यांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेले माजी आमदार रामनाथ मोते संतप्त झाले आहेत. आपल्या प्रकृतीचा कोणताही विचार न करता त्यांनी 22 जानेवारी रोजी रुग्णालयातील खाटेसह ठाणे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्याचा गंभीर इशारा शिक्षण विभागाला दिला आहे.
ठाणे जिल्ह्यातील शिक्षक आणि शिकक्षेतर कर्मचाऱ्यांची अनेक प्रकरणे ठाणे जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी नियमात असूनही ती रखडून ठेवली आहेत.यासाठी माजी आमदार रामनाथ मोते यांनी रुग्णालयात असतानाही अनेकदा त्यासाठी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला मात्र, त्यानंतरही शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांचे असंख्य प्रश्न तसेच प्रलंबित ठेवले असल्याने मोते संतप्त झाले आहेत. शिक्षकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी त्यांनी आपल्या प्रकृतीची पर्वा न करता कल्याण येथील रुग्णालयातून थेट जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मोते यांच्या या इशाऱ्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले असून जिल्हा शिक्षणाधिकारी विरोधात मोठया प्रमाणात संतप्त प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोते यांच्या या आंदोलनाची माहिती ठाणे-मुंबईतील असंख्य शिक्षकांना मिळाली असल्याने हे शिक्षक या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे शिक्षकांनी कळवले असल्याचे सांगण्यात आले. माजी आमदार रामनाथ मोते यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मार्फत ठाणे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना एक सविस्तर निवेदन देऊन जे विषय नियमात आहेत, परंतु तेही कसे सोडवले जात नाहीत, याची एक यादी दिली आहे. त्यासाठी आपण मागील अनेक वर्षांपासून करत असलेल्या पाठपुराव्याची माहितीही दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी, उपेक्षित घटकातील शिक्षकांना नियमात 
बसूनही जर कामे केली जात नसेल तर मी आपल्या जीवाची पर्वा न करता जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर आंदोलन करत असल्याचा इशारा दिला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...