Monday, 8 January 2018

मुल्ला येथे प्रेमप्रकरणातून एका युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

गोंदिया,दि.08- देवरी तालुक्यातील मुल्ला येथील एका युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी 12 च्या सुमारास घडल्याचे वृत्त आहे. देवरी पोलिसांनी या प्रकरणी मर्ग दाखल करून घटनेला दुजोरा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर युवतीचे गावातील एका युवकाशी प्रेमप्रकरण असल्याचे कळते. सदर मुलाने आपली फसवणुक केल्याचे लक्षात आल्याने त्या युवतीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात आहे. सदर प्रकरणी देवरी पोलिस गुन्ह्याची चौकशी करीत असून चौकशीअंती घटनेतील सत्य बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...